Bigg Boss 17 Ankita Lokhande And Vicky Jain Video: अंकिता लोखंडेने पती विकी जैनला चप्पलने मारले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 17 Ankita Lokhande And Vicky Jain Video: बिग बॉस या रीयालिटि शोच्या 17व्या सीझनची खूप चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. हे स्पर्धक सतत भांडणे आणि गॉसिपिंग करून चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अशा परिस्थितीत विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे.

Whatsapp Group
Telegram channel

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी बिग बॉसच्या घरात एकत्र प्रवेश केला. पण बिग बॉसच्या घरात आल्यानंतर या दोघांमध्ये सतत भांडणे होत असतात. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून या दोघांमधील अंतर वाढत आहे. अशा परिस्थितीत अंकिताने आता पती विकी जैन यांच्यावर घरातील सर्वांसमोर चप्पल फेकून मारले आहे (Bigg Boss 17 Ankita Lokhande And Vicky Jain Video). अंकिताने असे का केले हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.

Bigg Boss 17 Ankita Lokhande And Vicky Jain Video – अंकिताने विकी जैनला चप्पल मारली?

बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिता लोखंडेला तिचा पती विकी जैनचा खूप राग येतो. अंकिताने इतर सदस्यांसमोर खोटे बोलताना विकीला पकडले. यामुळे तिला खूप राग येतो. अंकिताला तिचा राग आवरता येत नाही आणि ती विकीवर चप्पल फेकताना दिसते.

त्याचं झालं असं की, या शोमध्ये मुनावर फारुकीनं प्रश्न उपस्थित केला आहे की, ‘दिमाग का घर‘ मध्ये राहणाऱ्या विकीने ईशा मालवीय आणि इतर स्पर्धकांसोबत जेवण शेअर केलं की नाही? ‘दिल का घर‘मध्ये राहणाऱ्या ईशाने मुनव्वरला सांगितले की, ‘दम का घर‘च्या खानजादीने ‘दिमाग का घर’ सदस्यांनी शिजवलेले अन्न खाल्ले होते. पण, विकी आणि खानजादी ईशाच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतात.

विकी आणि खानझादी एकमेकांवर आरोप करत होते. तेवढ्यात अंकिता लोखंडे तिथे आली. अंकिताला जेव्हा सर्व काही कळले तेव्हा तिने सांगितले की, तिने खानजादीला ‘दिमाग का घर’च्या स्पर्धकांचे जेवण खाताना पाहिले होते.

विकीने याची खिल्ली उडवली आणि अंकिताला तिच्या मानेला पकडून ओढले. अंकिताने विकीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण विकीने तिला मागून धरून ठेवले.

रागाच्या भरात अंकिताने तिची चप्पल विकीवर फेकली. हा प्रसंग पाहून घरातील बाकीचे स्पर्धक हसू लागले.

सनी आर्याला मजा आली

बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात मजेदार भांडण झाले. या भांडणात अंकिताने विकीवर चप्पल फेकली. ही लढत पाहून सनी आर्याला मजा आली. नॅशनल टेलिव्हिजनवर पत्नीने आपल्या पतीला चप्पल मारली, असे तो ओरडत होता.

विकी जैन हा करोडपती आहे

पवित्र रिश्ता अभिनेत्री अंकिता लोखंडेला सर्वजण ओळखतात. आता बिग बॉसमुळे तिचा नवरा विकी जैनही प्रत्येक घरात लोकप्रिय झाला आहे. विकी जैन हा व्यावसायिक आहे. अंकिता आणि विकीचे २०२१ मध्ये लग्न झाले. विकी जैन हा करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.

Ankita Lokhande-Vicky Jain

सुशांत सिंग राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे आणि विकी जैन पहिल्यांदाच एका पार्टीत भेटले होते. या पार्टीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अश्याच मजेदार न्यूज साठी आमहाला subscribe करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद

ALSO READ: पंकज त्रिपाठीच्या ‘कडक सिंह’चा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का?

Leave a comment

Whatsapp Group
Telegram channel